विजापूर जिल्ह्यातील मनगुळी परिसरातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मुळवाड येथील ‘भूमिका कोल्ड स्टोरेज’च्या मालकाने शेतकऱ्यांची द्राक्षे परस्पर विकून गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे.
कमी भाडे आणि चांगला दर मिळवून देण्याचे आमिष दाखवून आरोपी नातू राठोड याने शेतकऱ्यांचे ९७० बॉक्स द्राक्षे साठवून घेतले होते. मात्र, शेतकऱ्यांना न कळवता सुमारे २९ लाख रुपयांची द्राक्षे ५३० रुपये प्रति किलो दराने विकण्यात आली.

विक्रीनंतर मिळालेल्या रक्कमेपैकी भाडे व इतर रक्कम वजा करता शेतकऱ्यांना २० लाख रुपये मिळणे बाकी होते. वारंवार मागणी करूनही पैसे न मिळाल्याने शेतकऱ्यांनी विजापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तक्रार दाखल झाल्यानंतर आरोपीने ५ लाख रुपये दिले, मात्र उर्वरित रक्कम न देता मोबाईल बंद करून तो पसार झाला. अशाच प्रकारे इतरही अनेक शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.
कर्ज काढून आणि घरे गहाण ठेवून द्राक्ष बाग फुलवलेले शेतकरी आता हवालदिल झाले आहेत. विजापूर ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पसार आरोपीचा शोध सुरू आहे.
विजयकुमार सारवाड, इन न्यूज, विजापूर.


Recent Comments