NANDAGAD

खानापुरात मंत्री सतीश जारकीहोळी यांचे जंगी स्वागत

Share

खानापूर शहरात आगमन झालेले जिल्हा प्रभारी तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जಾರकीहोळी यांचे ब्लॉक काँग्रेसच्या वतीने जंगी स्वागत करून सत्कार करण्यात आला.

काँग्रेस नेते सुरेश जाधव आणि अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष तोहीद चांदखान यांच्या नेतृत्वाखाली मंत्री जारकीहोळी यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी नागरिक व कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती.

या प्रसंगी मंत्री सतीश जारकीहोळी यांनी स्थानिक नेते आणि सहकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा केली. त्यानंतर ते आपल्या पुढील नियोजित कार्यक्रमासाठी रवाना झाले.

या स्वागत सोहळ्याला अल्ताफ शेख, सद्दाम बडेघर यांच्यासह स्थानिक काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: