पश्चिम पदवीधर मतदारसंघ २००८ पासून भाजपच्या ताब्यात असून, यंदाही ‘एनडीए’चे उमेदवार एस. व्ही. संकनुर हेच तिसऱ्यांदा दणदणीत विजय मिळवतील, असा ठाम विश्वास केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी व्यक्त केला.

धारवाड येथे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी संकनुर यांच्या कार्याचा गौरव केला. संकनुर यांनी विधान परिषदेत पदवीधरांचे आणि तरुणांचे प्रश्न प्रभावीपणे मांडल्याचे ते म्हणाले.

केंद्रातील मोदी सरकारच्या धोरणांमुळे देशात स्टार्टअप आणि रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत. याउलट, राज्यातील काँग्रेस सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे, अशी टीका त्यांनी केली.
गेल्या तीन वर्षांत राज्यात तीन लाखांहून अधिक पदे रिक्त असूनही नोकरभरतीची कोणतीही जाहिरात काढण्यात आलेली नाही, असा आरोप करत त्यांनी काँग्रेसच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल केला.


Recent Comments