Vijayapura

विजापुरात मतदार यादीवरून राजकारण तापले; आमदार यत्नाळ विरुद्ध काँग्रेस आमनेसामने

Share

विजापूर शहरात विशेष मतदार यादी पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून भाजप आमदार बसणगौडा पाटील यत्नाळ आणि काँग्रेस नेते एकमेकांवर गंभीर आरोप करत आहेत.

२०१९ ते २०२६ दरम्यान मरण पावलेल्या तब्बल ८ हजारांहून अधिक लोकांची नावे अजुनही मतदार यादीत कायम असल्याचा दावा करत आमदार यत्नाळ यांनी मृत्यू प्रमाणपत्रांसह पुरावे प्रसिद्ध केले आहेत.

दुसरीकडे, जिवंत लोकांना मृत दाखवून त्यांची नावे वगळण्यासाठी बनावट मृत्यू प्रमाणपत्रांचा वापर केला जात असल्याचा आरोप काँग्रेस नेते अब्दुल हमीद मुश्रीफ यांनी केला आहे.

काँग्रेस शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आमदार यत्नाळ यांच्यावर कारवाईची मागणी केली असून, विजापूर शहरातील अल्पसंख्याक मतदारांना यादीतून हटवण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा केल्याने हे प्रकरण चिघळले आहे.

Tags: