खानापूर तालुक्यातील नंदगड येथील मुगुळ रस्त्यावर अंधार आणि रस्त्याची दुरवस्था झाल्याने ग्रामस्थांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

एका गल्लीतून दुसऱ्या गल्लीला जोडणाऱ्या या मुख्य रस्त्यावर झाडी-झुडपे वाढल्याने अर्धा रस्ता व्यापला गेला असून, रात्रीच्या वेळी पथदिवे नसल्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.

दिवसाही या भागात विषारी प्राण्यांचा वावर असतो, त्यातच रात्री अंधार असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नंदगड पंचायतीचा अतिरिक्त भार असलेले तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी रमेश मेत्री यांच्या निष्काळजीपणाबद्दल ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
वरिष्ठ अधिकारीच अशा प्रकारे दुर्लक्ष करत असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न कोण सोडवणार, असा सवाल उपस्थित होत असून जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी याकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.


Recent Comments