Khanapur

खानापूर: जुन्या बसस्थानकापर्यंत सर्व बसेस थांबवण्याची मागणी

Share

खानापूर शहरातील जुन्या बसस्थानकापर्यंत सर्व बसेस पुन्हा सुरू कराव्यात आणि मलप्रभा नदीच्या पुलापर्यंतचे अपूर्ण रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे, या मागणीचे निवेदन भाजप नेत्यांच्या नेतृत्वात मंत्री सतीश जारकीहोळी यांना देण्यात आले.

खानापूर शहरात गेल्या ५० वर्षांपासून जुन्या बसस्थानकापर्यंत सर्व बसेस थांबत होत्या. मात्र, प्रशासनाने ही सुविधा बंद केल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत.

या पार्श्वभूमीवर खानापूर येथील लोकमान्य भवनात आयोजित कार्यक्रमात जिल्हा प्रभारी मंत्री सतीश जारकीहोळी यांची भेट घेऊन भाजप मंडळाचे उपाध्यक्ष व शहराध्यक्ष ॲड. चेतन मणेरीकर, राजेंद्र रायका आणि धनश्री सरदेसाई यांनी निवेदन सुपूर्द केले.

तसेच हेस्कॉम कार्यालयापासून मलप्रभा नदीच्या पुलापर्यंतच्या सुमारे ३०० मीटर आरसीसी रस्त्याचे अपूर्ण काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

Tags: