हुबळी येथील नवीन गट्टूर भागात असलेल्या जैन मंदिराचे दार तोडून चोरट्यांनी दानपेटीतील सुमारे तीन लाख रुपये चोरून नेल्याची घटना घडली आहे.

चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून मंदिरात प्रवेश केला आणि दानपेटी फोडून रोकड लंपास केली. या घटनेत तीन चोरट्यांचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) आणि बेंडिगेरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक एस. आर. नायक यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत असून मंदिराच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे.


Recent Comments