Khanapur

खानापूर तालुक्यात रानटी हत्तींचा धुमाकूळ

Share

खानापूर तालुक्यातील निलावडे आणि नेरसा परिसरात रानटी हत्तींनी सलग दोन रात्री धुमाकूळ घालत शेतकऱ्यांच्या पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान केले आहे. या घटनेमुळे वन खाते आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षाविरोधात शेतकरी व नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

निलावडे व नेरसा भागात सोमवारी आणि मंगळवारी रात्री रानटी हत्तींनी शेतात घुसरून पिकांची नासधूस केली. सोमवारी रात्री नेरसा येथील शेतकरी गजानन मारुती बिरजे यांच्या सर्व्हे नंबर ७५ मधील सुमारे दोन एकर क्षेत्रातील ऊस आणि भातपीक पूर्णपणे उद्ध्वस्त केले.

त्याचप्रमाणे मंगळवारी रात्री शांताराम अमृत बोबाटे यांच्या सर्व्हे नंबर १४३ मधील शेतातील भातपिकाचेही मोठे नुकसान झाले.

वन खात्याने तोकडी भरपाई देण्याऐवजी रानटी हत्तींच्या उपद्रवावर तातडीने कायमस्वरूपी तोडगा काढावा आणि बाधित शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी माजी तालुका पंचायत सदस्य अशोक देसाई यांच्यासह स्थानिकांनी केली आहे.

Tags: