Belagavi

बेळगाव महानगरपालिकेत ऑनलाइन मालमत्ता कर सॉफ्टवेअरचे लोकार्पण

Share

बेळगाव शहरातील नागरिकांनी महानगरपालिकेकडे आपला मालमत्ता कर भरण्यासाठी नव्याने सुरू केलेल्या ऑनलाइन सॉफ्टवेअरचा वापर करावा, असे आवाहन महापौर प्रीती कामकर यांनी केले.

महानगरपालिकेच्या परिषद सभागृहात ऑनलाइन मालमत्ता कर प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले. ऑनलाइन कर भरण्याच्या या सुविधेमुळे नागरिकांचा वेळ वाचणार असून वेळेत कर भरणे शक्य होणार असल्याचे महापौरांनी सांगितले.

नागरिकांची गेल्या अनेक दिवसांपासून असलेली मागणी लक्षात घेऊन ही ऑनलाइन प्रणाली सुरू करण्यात आल्याचे उपमहापौर हनुमानत म्हापणसेकर यांनी स्पष्ट केले.

महानगरपालिका आयुक्त कार्तिक एम. यांनी माहिती देताना सांगितले की, पूर्वीप्रमाणेच ‘बेळगाव वन’ केंद्रे सुरू राहतील. नागरिकांच्या आणि विशेषतः ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी हे सॉफ्टवेअर तयार केले असून, रांगेत उभे न राहता घरबसल्या कर भरता येईल.

या प्रसंगी महसूल विभागाचे उपायुक्त डॉ. सिद्धू हुल्लोळी यांनी प्रास्ताविक करून सॉफ्टवेअर आणि ॲप्सच्या वापराबाबत माहिती दिली.

कार्यक्रमाला सत्ताधारी पक्षनेते संतोष पेडणेकर, विरोधी पक्षनेते सोहेल संगोळी, स्थायी समिती अध्यक्ष श्रेयस नाकाडी, राजू भातकांडे, सारिका पाटील, रमेश मैलुगोळ, नगरसेवक आणि पालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

Tags: