Vijayapura

अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या हालचालींना वेग

Share

अलमट्टी धरणाची पाणीसाठा पातळी ५۱۹.६० मीटरवरून ५२४.२५६ मीटरपर्यंत वाढवण्याच्या पार्श्वभूमीवर बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात उद्योगमंत्री एम. बी. पाटील यांनी जलसंपदा मंत्र्यांना पत्र लिहून भूसंपादन आणि भरपाई प्रक्रिया जलद गतीने राबवण्याची विनंती केली आहे.

अलमट्टी धरणाची उंची वाढल्यामुळे विजापूर आणि बागलकोट जिल्ह्यातील तब्बल १३४ गावांतील सुमारे ७५,५६३ एकर जमीन पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना योग्य आणि त्वरित भरपाई देणे अत्यंत गरजेचे असल्याचे एम. बी. पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

प्रस्तावित ३,००० कोटी रुपयांच्या भरपाई निधीतून बबलेश्वर तालुक्यातील किमान १,००० एकर जमिनीसाठी अंदाजे २० टक्के म्हणजेच सुमारे ५०० कोटी रुपयांची भरपाई राखीव ठेवावी, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.

याशिवाय शिरूर, कणबूर, चिक्कगलगली आणि होसूर या गावांतील शेतकऱ्यांना २०२६-२७ या आर्थिक वर्षातच भरपाई देण्याची विनंती करण्यात आली आहे. उर्वरित १० गावाकांसाठी तातडीने ११(१) अधिसूचना जारी करून भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश देण्याची मागणीही करण्यात आली आहे.

बाधित क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या भरपाईला उशीर होणार नाही याची दक्षता घेऊन सरकारने लवकरात लवकर भरपाईचा निधी मंजूर करावा, असा आग्रह एम. बी. पाटील यांनी धरला आहे.

Tags: