Belagavi

बेळगाव महानगरपालिकेत अधिकारी आणि नगरसेवकामध्ये वादावादी

Share

बेळगाव महानगरपालिका बैठकीत विकासकामांच्या मुद्द्यावरून अधिकारी आणि नगरसेवक यांच्यात जोरदार वाद झाला. बैठकीदरम्यान एमआयएमचे नगरसेवक शाहीद खान पठाण यांनी विकासकामांवरून प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर टीका केली होती.

या टीकेनंतर विकास विभागाच्या उपायुक्त लक्ष्मी निप्पाणीकर यांनी नगरसेवक शाहीद खान यांच्याशी थेट संवाद साधत तीव्र नाराजी व्यक्त केली आणि प्रशासकीय कारभाराबाबत आपली भूमिका मांडली.

आपण कोणत्याही दबावाखाली काम करणार नाही आणि नियमानुसारच सर्व कारभार चालणार असे लक्ष्मी निप्पाणीकर यांनी म्हटले.

या घटनेमुळे महानगरपालिका कार्यालयात काही काळ तणावाचे वातावरण तयार झाले असून राजकीय वर्तुळात यावर चर्चा सुरू आहे.

Tags: