बेळगाव महानगरपालिकेच्या बैठकीत ‘वंदे मातरम’ गीतावरून तीव्र खडाजंगी आणि गदारोळ झाला. ध्वनिवर्धकावर गीताची केवळ दोनच कडवी वाजल्याने भाजप नगरसेवकांनी संपूर्ण वंदे मातरम गायले.

महानगरपालिकेच्या बैठकीची सुरुवात राष्ट्रगीत आणि ‘वंदे मातरम’ने झाली. ध्वनिवर्धकावर दोनच कडवी वाजल्याने भाजप नगरसेवकांनी उभे राहून संपूर्ण गाणे पूर्ण केले.

यावर नामनिर्देशित सदस्य रमेश सोंटक्की यांनी आक्षेप घेतला. राज्य शासनाने वंदे मातरम केवळ दोन कडव्यांपुरते मर्यादित ठेवले असून सर्वांनी या आदेशाचे पालन करावे, असे ते म्हणाले.

या मागणीला भाजप नगरसेवकांनी तीव्र विरोध केला. काँग्रेस पक्षाने पूर्वी संपूर्ण गाणे स्वीकारले होते, मग आता विरोध कशासाठी, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
गदारोळ वाढल्यानंतर महापौर प्रीती कामकर यांनी ध्वनिवर्धक व्यवस्थापनावर तीव्र नाराजी व्यक्त केली. संपूर्ण वंदे मातरम गाण्यात काहीही चुकीचे नाही, असे स्पष्ट करत महापौरांनी तांत्रिक त्रुटीबाबत कौन्सिल सचिवां कडून स्पष्टीकरण मागवले.


Recent Comments