एसआयआर (विशेष संक्षिप्त पुनरीक्षण) मतदार यादी पुनरीक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना अटक करण्याची मागणी करत विजापूर जिल्हा काँग्रेसच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली.


पालकमंत्री एम. बी. पाटील यांच्या नेतृत्वात काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य पदयात्रा काढली. यावेळी कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. एसआयआरच्या नावाखाली पात्र मतदारांचे हक्क हिरावून घेऊ नयेत, अशी मागणी पालकमंत्र्यांनी केली.

आंदोलनादरम्यान मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या पुतळ्याचे दहन करून संताप व्यक्त करण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून ज्ञानेश कुमार यांच्यावर कारवाई करण्याची आणि त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली. या आंदोलनात जिल्हा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन लोणी, नेते अब्दुल हमीद मुश्रिफ, डॉ. प्रभूगौडा, महापालिकेचे नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


Recent Comments