खानापूर तालुक्यातील गुंडेनट्टी येथील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक ईश्वरप्पा बाळाप्पा चन्नन्नवर (वय ९५) यांचे वृद्धपकाळाने निधन झाले.

त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. खानापूर तालुक्यातील एकमेव हयात स्वातंत्र्यसैनिक असलेले गुंडेनट्टी येथील ईश्वरप्पा बाळाप्पा चन्नन्नवर (९५) यांचे २७ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. अनेक वर्षांपूर्वीच त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, चार मुली, १६ नातवंडे, पणतवंडे असा मोठा परिवार आहे.

देशसेवेसाठी योगदान दिलेल्या या ज्येष्ठ व्यक्तिमत्त्वाच्या निधनाबद्दल लोकप्रतिनिधी, मान्यवर आणि ग्रामस्थांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.


Recent Comments