Vijayapura

निवडणूक आयुक्तांविरोधात काँग्रेसचे कारस्थान : खास. गोविंद कारजोळ यांचा आरोप

Share

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात काँग्रेस कारस्थान रचत असल्याचा गंभीर आरोप खासदार गोविंद कारजोळ यांनी केला.

विजापूर येथे पत्रकार परिषदेत बोलताना खासदार गोविंद कारजोळ यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. एसआयआर मुद्द्यावरून काँग्रेसकडून निवडणूक आयोगाला लक्ष्य केले जात असून, पंतप्रधान मोदींशी सामना करता येत नसल्याने देशात अराजकता पसरवण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांनी सांगितले. ज्ञानेश कुमार हे दलित समाजातील प्रामाणिक आयएएस अधिकारी असून काँग्रेसला हे सहन होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच राज्यातील पावसाच्या तूट परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, रोहयो अंतर्गत अधिक रोजगार उपलब्ध करून द्यावा आणि गोशाळा सुरू कराव्यात, अशी मागणीही खासदार गोविंद कारजोळ यांनी केली.

Tags: