विजापूर जिल्ह्यातील कल्लाकवटगी गावात पावसासाठी गाढवांचे लग्न लावून गावकऱ्यांनी सामूहिक प्रार्थना केली.

विजापूर जिल्ह्यात पावसाने ताण दिल्यामुळे पिके वाळू लागली असून शेतकऱ्यांसमोर संकट उभे ठाकले आहे. या पार्श्वभूमीवर तिकोटा तालुक्यातील कल्लाकवटगी गावातील श्री संगमनाथ मंदिर परिसरात गाढवांचे पारंपरिक पद्धतीने लग्न लावून देण्यात आले. गाढवांना सजवून सर्व धार्मिक विधी पार पाडल्यानंतर वाजतगाजत गावातून मिरवणूक काढण्यात आली. महिलांनी गाढवांचे औक्षण करून पूजन केले. यानंतर सर्व गावकऱ्यांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. पावसासाठी ग्रामीण भागात पूर्वापार चालत आलेल्या श्रद्धेतून हा उपक्रम राबवण्यात आल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.

विजयकुमार सारवाड
इन न्यूज, विजापूर


Recent Comments