Vijayapura

स्वाती रामानंद तीर्थ यांची जयंती साजरी करण्याची मागणी

Share

विजापूर जिल्ह्यातील विविध संघटनांच्या प्रमुखांनी हैदराबाद मुक्ती संग्रामाचे महानायक स्वामी रामानंद तीर्थ यांची जयंती ३ ऑक्टोबर रोजी राज्यभरातील शाळा, महाविद्यालये आणि शासकीय कार्यालयांत साजरी करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात विजापूरचे जिल्हाधिकारी के. आनंद यांच्यामार्फत मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, पालकमंत्री एम. बी. पाटील आणि कन्नड व संस्कृती विभागाला निवेदन सादर करण्यात आले.

संघटनांचे नेते विनोद खेड यांनी सांगितले की, स्वामी रामानंद तीर्थ म्हणजेच व्यंकटराव खेडगीकर यांचा जन्म ३ ऑक्टोबर १९०३ रोजी विजापूर जिल्ह्यातील सिंदगी तालुक्यात झाला. भारतीय स्वातंत्र्यलढा आणि हैदराबाद मुक्ती संग्रामात त्यांनी दिलेले योगदान उल्लेखनीय आहे. त्यामुळे राज्य सरकारने त्यांचा जन्मदिवस शासकीय पातळीवर साजरा करावा.

इतिहास संशोधक लायप्पा इंगळे यांनी सांगितले की, स्वामी रामानंद तीर्थ यांनी शिक्षणतज्ज्ञ, कामगार नेते आणि वंचित घटकांच्या विकासासाठी आयुष्य वेचले. तेलंगणा व आंध्र प्रदेश सरकारने त्यांची स्मारके उभारली आहेत, तर महाराष्ट्र सरकारने नांदेड येथे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची स्थापना करून त्यांचा गौरव केला आहे. कर्नाटक सरकारनेही त्यांची जयंती साजरी करावी, अशी मागणी त्यांनी केली.

या वेळी मल्लानागौडा पाटील (बरटगी), प्रदीप देशपांडे, कल्लाप्पा शिवशरण, अंबण्णा गुन्नापूर, राजू तडलगी, संतोष कलगुडी, राजू कुमटगी, अशोक चोळके, अयुबखान नदाफ, मोहम्मद बागवान, एम. एम. हंगरगी यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: