बेळगाव जिल्ह्यातील कागवाड तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, या मागणीसाठी माजी मंत्री श्रीमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राणी चन्नम्मा चौकात आंदोलन छेडण्यात आले होते. याची दखल घेत राज्य सरकारने कागवाड तालुका दुष्काळग्रस्त घोषित केला.


या पार्श्वभूमीवर गुरूवारी माजी मंत्री श्रीमंत पाटील यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते दादा पाटील, भाजप मंडळ अध्यक्ष अरुण गणेशवाडी, राकेश पाटील, वकील तसेच एसटी समाजाचे अध्यक्ष प्रवीण कंपवाडे, सचिन कवटगे, प्रकाश चौगुले, अण्णासाहेब डुगुनाव्हर, संदीप साळुंखे आणि वैयक्तिक सहाय्यक विनायक शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी एकत्रित येत फटाके फोडून व मिठाई वाटून आनंद व्यक्त केला. त्यानंतर कार्यकर्त्यांनी हेस्कॉम (HESCOM) कार्यालयाला भेट देऊन ७ तास वीज पुरवठा करण्याबाबतचे लेखी पत्र घेतले.




Recent Comments