Kagawad

शिरगुप्पी शुगर्सच्या १६ व्या गळीत हंगामाचा प्रारंभ

Share

कागवाड तालुक्यातील शिरगुप्पी शुगर वर्क्स कारखान्याच्या १६ व्या गळीत हंगामाची सुरुवात बॉयलर पूजनाने झाली.

हुक्केरी तालुक्यातील निडसोसी मठाचे पंचम शिवलिंगेश्वर स्वामीजी आणि नांदणी जैन मठाचे जनसेना भट्टारक स्वामीजी यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. कारखान्याचे अध्यक्ष के. पी. मगेण्णावर आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेंद्र दोड्डन्नवर यांच्या हस्ते बॉयलर व ऊस कॅरियरचे पूजन करण्यात आले.

पंचम शिवलिंगेश्वर स्वामीजींनी कारखान्याच्या कामगिरीचे कौतुक करत शिरगुप्पी शुगर्सने नेहमीच शेतकऱ्यांना चांगला दर दिला असल्याचे सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांनी याच कारखान्याला मोठ्या प्रमाणावर ऊस पुरवठा करावा, असे आवाहन त्यांनी केले.

अध्यक्ष के. पी. मगेण्णावर यांनी शेतकऱ्यांच्या सहकार्याबद्दल आभार मानले. इतर कारखान्यांच्या तुलनेत अधिक दर देण्याची परंपरा पुढेही चालू राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यंदा पाऊस कमी झाल्यामुळे ऊस उत्पादन घटले असून गळीत हंगाम कमी दिवस चालण्याची शक्यता डॉ. राजेंद्र दोड्डन्नवर यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाला कारखान्याचे सर्व संचालक, अधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.

Tags: