Bellary

बळ्ळारीत घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने लंपास

Share

बळ्ळारीत चोरट्यांचा सुळसुळाट वाढला असून, रात्रीच्या वेळी कुटुंबीय गाढ झोपेत असताना घराची खिडकी व दार तोडून लाखांचे सोने आणि चांदीचे दागिने लांबवल्याची घटना घडली आहे.

बळ्ळारी शहरातील इन्ना रेड्डी कॉलनीतील रहिवासी एम. श्रीधर यांच्या घरात रात्रीच्या वेळी ही चोरी झाली. कुटुंबीय घरात झोपलेले असताना खिडकी आणि दार तोडून आत घुसलेल्या चोरट्यांनी सुमारे १६ लाख रुपये किमतीचे २११ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि २ लाख १६ हजार रुपये किमतीचे १२०० ग्रॅम चांदीचे दागिने चोरून पोबारा केला. ही घटना जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, माहिती मिळताच कौलबाजार पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.

Tags: