विजापूर जिल्ह्यातील तिकोटा तालुक्यातील रामापूरजवळ बस न थांबवल्याच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी रस्ता रोको आंदोलन केले. राज्य महामार्गावर झालेल्या या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

रामापूर येथून तिकोटा आणि विजापूर शहरात दररोज शाळा-कॉलेजसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना बससाठी तासनतास ताटकळत राहावे लागत आहे. रामापूर थांब्यावर बस चालक बस न थांबवता निघून जातात, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. या प्रकारामुळे शैक्षणिक नुकसानाला सामोरे जावे लागत असल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी बेळगाव–कलबुर्गी राज्य महामार्गावर ठिय्य आंदोलन मांडले.

या आंदोलनाला स्थानिक ग्रामस्थांनीही पाठिंबा दर्शवला असून रामापूर येथे बस नियमित थांबवण्यासाठी परिवहन महामंडळाने योग्य ती पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनामुळे राज्य महामार्गावरील वाहतूक काही वेळ खोळंबली होती.


Recent Comments