Belagavi

सरकारी सुविधा जनतेच्या दारापर्यंत पोहोचल्या पाहिजेत : विपस चन्नराज हट्टीहोळी

Share

शासनाच्या विविध योजना आणि सुविधा कोणत्याही अडथळ्याशिवाय पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. नागरिकांना सरकारी कार्यालयांचे फेरे मारावे लागू नयेत, तर प्रशासनानेच जनतेच्या दारापर्यंत पोहोचून समस्या सोडवल्या पाहिजेत, असे प्रतिपादन विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी केले.

बेळगाव जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत आणि तालुका प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने उचगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात आयोजित ‘प्रजासेवा अभियान’ कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी विविध शासकीय योजनांतील पात्र लाभार्थ्यांना हक्कपत्रे व सुविधांचे वितरण करण्यात आले.

माहितीचा अभाव किंवा कागदपत्रांच्या अडचणींमुळे कोणताही पात्र नागरिक योजनांपासून वंचित राहू नये, हाच या अभियानाचा मुख्य उद्देश असल्याचे हट्टीहोळीयांनी सांगितले. शासकीय योजनांमध्ये पारदर्शकता आणून मध्यस्थांचा हस्तक्षेप पूर्णपणे टाळण्याचे आणि अधिकाऱ्यांनी लोकाभिमुख प्रशासनाला प्राधान्य देण्याचे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमाला काडा अध्यक्ष युवराज कदम, युवा काँग्रेस नेते मृणाल हेब्बाळकर, तालुकास्तरीय विविध विभागांचे अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: