कर्नाटक राज्य हसिरू सेनेच्या नेतृत्वाखाली कागवाड मधील मंगसुळी गावात १३ सप्टेंबर रोजी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

सेना शेतकरी संघटनेचे अध्यक्ष चुन्नप्पा पुजारी, गौरव अध्यक्ष शशिकांत गुरुजी, माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी तसेच मारुती नाना चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मंगसुळी गावात १३ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता जाहीर सभा पार पडणार आहे, अशी माहिती आईनापूर येथील शेतकरी कार्यकर्ते संजय बिरडी यांनी दिली.

पुढे माहिती देताना त्यांनी सांगितले, की मंगसुळी येथील बिरोबा मंदिराच्या सभागृहात कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा तसेच ‘हसिारू शाळा परिवर्तन’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या जाहीर सभेत चालू हंगामातील उसाचा दर निश्चित करणे आणि वीज पुरवठ्यातील खंडामुळे शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर विशेष चर्चा केली जाणार आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर होणाऱ्या या सभेचा कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन मंगसुळी गावातील शेतकरी संघटनेच्या सदस्यांनी निवेदनाद्वारे केले आहे, असे संजय बिरडी यांनी स्पष्ट केले.


Recent Comments