खानापूर तालुक्यातील हेस्कॉम कर्मचाऱ्यांच्या टंचाईची समस्या सोडवण्यात माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांना यश आले आहे. कर्मचाऱ्यांच्या मागणीची दखल घेत त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे तालुक्याला ४५ कनिष्ठ पॉवरमन मिळाले आहेत.

तालुक्यात लाईनमनची तीव्र टंचाई असल्याने कर्मचाऱ्यांनी रायगड येथे डॉ. अंजली निंबाळकर यांची भेट घेऊन आपली समस्या मांडली होती. त्यावर तात्काळ कारवाई करत त्यांनी हेस्कॉम व्यवस्थापक वैशाली आणि ऊर्जा मंत्र्यांशी संपर्क साधून परिस्थितीची गांभीर्याने माहिती दिली. या पाठपुराव्याची तात्काळ दखल घेत विभागाने खानापूर तालुक्यासाठी ४५ कनिष्ठ पॉवरमन मंजूर केले. ही अडचण दूर झाल्याबद्दल हेस्कॉम कर्मचाऱ्यांनी खानापूर येथे डॉ. अंजली निंबाळकर यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले.



Recent Comments