पैशांच्या देवाणघेवाणीतील वादातून एका रिअल इस्टेट व्यावसायिकाची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना बळ्ळारी जिल्ह्यातील कुरुगोडू तालुक्यात घडली आहे.

कुरुगोडू तालुक्यातील यल्लापूर क्रॉसजवळ केवळ दहा हजार रुपयांच्या कर्जाच्या वादातून एन. उमामहेश्वर (वय ३८) या रिअल इस्टेट व्यावसायिकावर प्राणघातक शस्त्रांनी हल्ला करून त्यांची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपी अरुण कुमार याने उमामहेश्वर यांच्याकडे ६० हजार रुपयांचे कर्ज मागितले होते. उमामहेश्वर यांनी ५० हजार रुपये दिले तरीही दोघांमध्ये वाद सुरूच होता. उर्वरित १० हजार रुपये देण्यास सांगताना अरुण कुमार, हंडी हनुमंता आणि मंजुनाथ या तिघांनी मिळून उमामहेश्वर यांच्यावर हल्ला करत त्यांची हत्या केली.

घटनेची नोंद होताच कुरुगोडू पोलिसांनी तात्काळ सूत्रे हलवून तिन्ही आरोपींना अटक केली असून, या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.


Recent Comments