विजापूर जिल्ह्यातील मुद्देबिहाळचे आमदार सी. एस. आप्पाजी नाडगौडा आणि पालकमंत्री एम. बी. पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष अधिक चिघळला आहे. मंत्री एम. बी. पाटील यांच्या टीकेला उत्तर देताना आमदार नाडगौडा यांनी फेसबूक पोस्टद्वारे थेट आणि खरमरीत प्रत्युत्तर दिले आहे.

माझे जीवन आणि राजकारण सुरुवातीपासूनच पारदर्शक राहिले आहे, त्यामुळे मागील दाराने राजकारण करणे मला जमणारे नाही, असा टोला आमदार नाडगौडा यांनी लगावला. याचा अर्थ मला राजकारणातील डावपेच ठाऊक नाहीत असा होत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. मतदारसंघाचा विकास, जनतेचे कल्याण आणि शेतकऱ्यांचे हित याच गोष्टींना आपले सर्वोच्च प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले.

मुद्देबिहाळ तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याच्या मुद्द्यावरून आमदार नाडगौडा यांनी आवाज उठवल्यानंतर मंत्री एम. बी. पाटील आणि त्यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले आहे. आता या फेसबूक पोस्टमुळे विजापूरच्या राजकीय वर्तुळात नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


Recent Comments