कार्यक्रमाला ज्येष्ठ समाजसेवक डॉ. शिवाजीराव कागणीकर आणि चार्टर्ड अकाउंटंट आर. एन. हरगुडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. रोपाला पाणी घालून व कु. क्षितिज सांबरेकर यांच्या निसर्गगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

सत्काराला उत्तर देताना ॲड. कामाण्णाचे यांनी फळांच्या बियांपासून झाडे उगवताना पाहून जंगलात बीजपेरणीची कल्पना सुचल्याचे सांगितले. अनेकांच्या सहकार्याने ऑगस्टअखेर रेसकोर्स परिसर व कलानिधी गडावर १०,२५३ बिया पेरण्यात आल्या. २०३६ पर्यंत उपक्रम सुरू ठेवून २०२७ च्या पावसाळ्यात १ लाख बिया पेरण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. शिवाजीराव कागणीकर यांनी वाढत्या प्रदूषणाबद्दल चिंता व्यक्त केली. हवा, पाणी आणि मातीचे प्रदूषण रोखण्यासाठी ॲड. कामाण्णाचे व मॉर्निंग वॉकर्स ग्रुपचा बीजपेरणी उपक्रम काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी सी. ए. आर. एन. हरगुडे यांनीही ऍड. मारुती कामाण्णाचे आणि मॉर्निंग ग्रुपच्या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विजय सांबरेकर यांनी केले, तर प्रभाकर रेवणकर यांनी आभार मानले. यावेळी बसवराज गाणगेर, सी. बी. पाटील, रत्नाकर कलमणी, अशोक तरळे, बबन वानखेडे, राहुल राणे, अशोक भुसारे, रेनॉल्ड डिसूझा यांच्यासह ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.


Recent Comments