चिक्कोडी शहरातील हालट्टी परिसरात वीज तारेला स्पर्श झाल्याने माकडाच्या एका पिलाचा मृत्यू झाला. मृत पिलाला सोडण्यास तयार नसलेली माकडाची आई त्याला घेऊन परिसरात फिरत असल्याचे दिसून आले.

हालट्टी परिसरात फिरणाऱ्या माकडांच्या कळपातील एका पिलाचा वीज खांब आणि तारेला स्पर्श झाल्याने जागीच मृत्यू झाला. पिलाचा मृत्यू झाल्याचे लक्षात न आल्याने माकडाच्या आईने त्याला उचलून रस्त्यावर फिरत आक्रोश केला.

मृत पिलाला छातीशी धरून त्याला वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या माकडीणीची अवस्था पाहून स्थानिक हळहळले. आपल्या पिलाला सोडण्यास ती तयार नसल्याचे पाहायला मिळाले. स्थानिकांनी प्रयत्न करून माकडीणीपासून पिलाला वेगळे करत मृत पिलावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


Recent Comments