स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमादरम्यान एका व्यक्तीने उघडपणे हवेत गोळीबार केल्याची घटना घडली आहे. धारवाड तालुक्यातील कुरुबगट्टी ग्रामपंचायतीसमोर ध्वजारोहण सोहळा सुरू असताना हा प्रकार घडला असून, घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.

राष्ट्रगीत सुरू असताना बसवंतप्पा मोरबद नावाच्या व्यक्तीने दुहेरी नळीच्या बंदुकीतून हवेत दोन फेऱ्या झाडल्या. सार्वजनिक ठिकाणी आणि विशेषतः शाळकरी मुले व नागरिक उपस्थित असलेल्या ठिकाणी अशा प्रकारे गोळीबार केल्याने उपस्थितांमध्ये घबराट पसरली.

गरगा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून, व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. संबंधित व्यक्तीविरोधात कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.


Recent Comments