खानापूर तालुक्यातील ऐतिहासिक नंदगड ग्रामपंचायतीमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन सोहळा अत्यंत उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला.


ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात आयोजित सोहळ्यात पंचायत विकास अधिकारी (पीडीओ) सागरकुमार बिरादार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणापूर्वी त्यांनी महात्मा गांधी व डॉ. बी. आर. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने विविध उपक्रम हाती घेण्यात येत असून त्याला शाळा व्यवस्थापन समिती आणि स्थानिक संस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन पीडीओ सागरकुमार बिरादार यांनी केले.
स्वातंत्र्यदिनानिमित्त उपस्थीत शालेय विद्यार्थ्यांना मिठाई वाटप करण्यात आली. या सोहळ्याला गावातील ज्येष्ठ नागरिक, माजी लोकप्रतिनिधी, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments