कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीच्या (KPCC) अनुसूचित जाती (SC) विभागाच्या कर्नाटक राज्य संचालकपदी बेळगावातील दलित नेते मल्लेश चौगुले यांची निवड झाल्याबद्दल काँग्रेस भवनात विविध दलित समाज संघटनांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

KPCC SC विभागाचे राज्य उपाध्यक्ष लक्ष्मण लगमापगोल यांच्या नेतृत्वाखाली हा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. मल्लेश चौगुले यांची राज्यस्तरीय जबाबदारीवर नियुक्ती झाल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी काँग्रेस नेते सद्दाम तशीलदार, काँग्रेस युथ ब्रिगेड बेळगाव दक्षिणचे सिद्धार्थ चव्हाण, चर्म कुशल धार्मिक संघाचे अध्यक्ष संतोष होंगल, सामगर समाजाचे नेते हिरालाल चव्हाण, ढोर समाजाचे अध्यक्ष विठ्ठल पोळ, एससी-एसटी सोसायटीचे अध्यक्ष संदीप कोलकार, माजी नगरसेवक राजेश तिर्कनावर, सामगर समाजाचे नेते संजय चौगुले, मांग समाजाचे नेते सुरेश लोंढे, संतोष कांबळे तसेच इराप्पा कळेमणी यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मल्लेश चौगुले यांच्या निवडीमुळे बेळगावातील सामाजिक आणि काँग्रेस क्षेत्रातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यस्तरावर मिळालेल्या या जबाबदारीच्या माध्यमातून अनुसूचित जाती समाजाच्या प्रश्नांना अधिक प्रभावीपणे मांडण्यासाठी आणि संघटनात्मक कार्याला बळ देण्यासाठी चौगुले यांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.
दरम्यान, सत्कार स्वीकारताना मल्लेश चौगुले यांनी विविध समाजघटकांच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.


Recent Comments