धारवाड कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी गेल्या २४ दिवसांपासून पुकारलेल्या आंदोलनाची दखल घेत कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

९४५ कृषी अधिकारी पदांच्या भरतीत इतर पदवीधरांना संधी देण्याच्या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. त्यानंतर प्राधिकरणाने ८ आणि ९ ऑगस्ट रोजी होणारी परीक्षा रद्द करून स्थगितीचा अधिकृत आदेश जारी केला आहे.

धारवाड कृषी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावर आणि प्रशासकीय इमारतीसमोर विद्यार्थ्यांनी २४ दिवस अहोरात्र धरणे आंदोलन आणि उपोषण केले होते. या आंदोलनादरम्यान काही विद्यार्थ्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. विद्यार्थ्यांचा विरोध पाहत प्रशासनाने अखेर परीक्षा रद्द केली आहे.


Recent Comments