hubali

राहुल गांधींबाबतच्या वक्तव्यानंतर भाजप आमदाराविरोधात गुन्हा

Share

राहुल गांधी यांच्याविषयी केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यानंतर भाजप आमदार यशपाल सुवर्ण यांच्याविरोधात हुबळीतील उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हुबळी विद्यानगर ब्लॉक काँग्रेस समितीने याबाबत तक्रार दाखल केली होती. यावेळी काँग्रेस नेते रजत उळ्ळागड्डीमठ यांनी माध्यमांशी बोलताना, आमदार यशपाल सुवर्ण यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सामाजिक सलोखा बिघडू शकतो, असा आरोप केला. संबंधित प्रकरणाची गंभीर दखल घेऊन त्यांच्याविरोधात तातडीने कायदेशीर कारवाई करावी आणि अटक करावी, अशी मागणी रजत उळ्ळागड्डीमठ यांनी केली.

Tags: