केंद्रीय शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशी यांच्याबाबत प्रियांका गांधी यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ हुबळी-धारवाड महानगर भाजप महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी शेकडो महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

भाजप कार्यालयापासून काढण्यात आलेल्या मोर्चात कार्यकर्त्यांनी प्रियांका गांधी यांच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. मोर्चा काँग्रेस कार्यालयाच्या दिशेने निघाला.

कारवार रोडवरील काँग्रेस कार्यालयाजवळ मोर्चा पोहोचताच पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखून ताब्यात घेतले. या कारवाईत भाजपच्या हुबळी-धारवाड महानगर महिला मोर्चाच्या अध्यक्षा सीमा लदवा, अक्कम्मा हेगडे, सुमा शिवनगौडर तसेच महापालिकेतील काही नगरसेवकांसह अन्य कार्यकर्त्यांचा समावेश होता.


Recent Comments