Vijayapura

अलमट्टी जलाशयात मुबलक पाणीसाठा असूनही शेतकरी वंचित

Share

विजापूर जिल्ह्यातील अलमट्टी धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असतानाही शेतीसाठी पाणी न सोडल्याने उत्तर कर्नाटकातील पिके सुकू लागली असून शेतकरी चिंतेत सापडले आहेत.

अलमट्टी धरणात सध्या ११४ टीएमसीपेक्षा जास्त पाणीसाठा उपलब्ध आहे. धरणात ७३ हजार क्युसेकपेक्षा जास्त आवक होत असून नदीपात्रातून २७ हजार क्युसेकहून अधिक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मात्र, शेतीसाठीच्या कालव्यांमध्ये पाण्याचा विसर्ग शून्य क्युसेक ठेवण्यात आला आहे.

जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने तूर, मका, कापूस, सूर्यफूल आणि कांदा यांसारखी पिके पाण्याच्या अभावी सुकू लागली आहेत. सध्या केवळ पिण्याच्या पाण्यासाठी तलाव भरण्याचे काम सुरू असून शेतीसाठी पाणी सोडले जात नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे.

पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलने केली असून प्रशासनाला निवेदनेही दिली आहेत. परंतु, कृष्णा पाटबंधारे सल्लागार समितीची बैठक किंवा शासनाकडून कोणताही स्पष्ट निर्णय न झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

शासनाने आणि संबंधित विभागाने तातडीने निर्णय घेऊन अलमट्टी धरणातून कालव्यांद्वारे शेतीसाठी पाणी
विजयकुमार सारवाड, इन न्यूज, विजापूर

Tags: