State

राहुल गांधी यांच्याविरोधात बंगळुरूमध्ये भाजपची निदर्शने

Share

भाजप आमदार बी. पी. हरीश यांच्यासह पक्षाच्या इतर नेत्यांवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज विधानसौध येथील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर भाजप नेत्यांनी तीव्र निदर्शने केली. काँग्रेस सरकारवर खरमरीत शब्दांत टीका करत नेत्यांनी राज्यात ‘गुंडांचे राज्य’ सुरू असल्याचा आरोप केला.

बंगळुरू येथील केपीसीसी कार्यालयाजवळ हरिहरचे आमदार बी. पी. हरीश आणि भाजप नेत्यांवर अंडी फेकून हल्ला करण्यात आल्याच्या घटनेचा भाजप नेत्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. विधानसौध आवारात झालेल्या या मोठ्या आंदोलनात विरोधी पक्षनेते आर. अशोक, भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते चलवादी नारायणस्वामी यांच्यासह अनेक आमदार आणि प्रमुख नेते सहभागी झाले होते. या वेळी बोलताना बी. वाय. विजयेंद्र म्हणाले की, नीट प्रकरणावर केंद्र सरकार आणि शिक्षणमंत्र्यांनी आधीच स्पष्टीकरण दिले असतानाही काँग्रेस आपले राजकीय हित साधण्यासाठी भाजप आमदारांवर हल्ले करत आहे.

या वेळी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवताना विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी काँग्रेस पुरस्कृत देशविरोधी कृत्यांचा तीव्र निषेध केला. राहुल गांधी देशद्रोही आणि कॉकरोच पार्टीसारख्या घटकांना पाठिंबा देत असून पंतप्रधान कार्यालयासमोर कायदा हातात घेण्याचे काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. संसदेत किंवा रस्त्यावर पंतप्रधान मोदींविरोधात बोलण्याची काँग्रेस नेत्यांची लायकी नाही, अशी टीका करत अशोक यांनी राज्यात लोकशाही पूर्णपणे कोलमोडली असल्याचे म्हटले.

Tags: