वातावरणातील घटक बदलावर मात करण्यासाठी प्रत्येकाने झाडे लावून ती जगवणे गरजेचे असून याच उद्देशाने उगार लायन्स क्लबच्या वतीने एकूण ५०० रोपे लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती अध्यक्ष डॉ. मोहन कटगेरी यांनी दिली.


गुरुवारी उगार येथील विनायकवाडी ते फरीदखानवाडी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वृक्षारोपण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. अध्यक्ष डॉ. मोहन कटगेरी, सचिव डॉ. आनंद कुंभार आणि इतर पदाधिकाऱ्यांनी पूजन करून या उपक्रमाची सुरुवात केली.


यावेळी बोलताना लायन्स क्लबचे सचिव डॉ. आनंद कुंभार यांनी सांगितले की, “लायन्स क्लब ही एक सेवाभावी संस्था असून जगभरात निस्वार्थी सेवा देत आहे. उगार शाखेतर्फेही सातत्याने सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. निसर्गाचा बिघडलेला समतोल सुधारण्यासाठी हा वृक्षारोपणाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.” उगार क्लबच्या या सामाजिक कार्यात सहभागी होण्यासाठी नागरिकांनी सदस्य म्हणून पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
याप्रसंगी लायन्स क्लबचे ज्येष्ठ सदस्य भूपाल चौगुले, पी. बी. कुलकर्णी, मनोज मालगत्ते, महादेव दानन्नवर यांच्यासह नगरपालिका सदस्य राजू पाटील, प्रकाश थूरशे, अजित कटगेरी, संजय चव्हाण, विनायक कांबळे, सोमेश्वर अंबेले, शिवमूर्ती कटगेरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments