gokak

गोकाकमधील कोचिंग सेंटरमध्ये शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार

Share

गोकाक शहरातील एका कोचिंग सेंटरमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकानेच दोन अल्पवयीन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

ह्या प्रकारानंतर पीडित मुलींचे पालक आणि स्थानिक नागरिकांनी कोचिंग सेंटरसमोर एकत्र येत जोरदार आंदोलन छेडले. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या पाया पडून “माझ्या मुलीला न्याय द्या,” असा टाहो फोडत पीडित मुलीच्या आईने अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

घटनेचे गांभीर्य ओळखून गोकाक शहर पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयित आरोपी शिक्षकाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी गोकाक शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील कायदेशीर तपास करत आहेत.

Tags: