विजापूर जिल्ह्यातील इंडी शहरातील डॉ. बी. आर. आंबेडकर मॅट्रिकोत्तर मुलांच्या वसतिगृहात १७ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अभिजीत समगार असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून, वसतिगृहातील खोलीत त्याचा मृतदेह आढळून आला आहे.

घटनेपूर्वी विद्यार्थ्याने एक चिठ्ठी लिहून ठेवली असून, त्यात आपण आत्महत्या का करत आहोत याचे कारण व्हॉट्सॲपवर शेअर केले असून नातेवाईकांनाही पाठवल्याचे नमूद केले आहे. याशिवाय चिठ्ठीत आई-वडील आणि भावांचे मोबाईल क्रमांकही लिहून ठेवल्याची माहिती समोर आली आहे.

सदर विद्यार्थी गेल्या काही दिवसांपासून मानसिकदृष्ट्या आजारी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. मात्र, आत्महत्येचे अचूक कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच इंडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.


Recent Comments