Uncategorized

कागवाड : दुष्काळ व आपत्ती व्यवस्थापनाचा आम. कागेंकडून आढावा

Share

कागवाड तालुक्यात चालू वर्षी पडलेल्या अल्प पावसामुळे निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती आणि महापुराच्या पार्श्वभूमीवर आमदार राजू कागे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष आढावा बैठक पार पडली.

शासकीय आदेशानुसार तालुक्यातील परिस्थितीचे सर्वेक्षण करणे आणि आपत्ती व्यवस्थापनाची पूर्वतयारी करण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली. कृष्णा नदीला महापूर आल्यास नदीकाठच्या मंगावती, जुगुळ, शहापूर, मोळवाड, कृष्णा-कित्तूर, कुसनाळ आणि वनिजावाड या गावांमध्ये बोटींची सोय करणे तसेच पुनर्वसन केंद्र सुरू करण्याबाबत पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला.

गेल्या दोन महिन्यांत झालेल्या अत्यल्प पावसामुळे नागरिकांना व जनावरांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये यासाठी उपाययोजना आखण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. या वेळी पशुसंवर्धन विभागाचे जी. एम. कांबळे, कृषी विभागाचे लिंगाना बिरादार, कांतिनाथ बिरादार आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून आवश्यक माहिती दिली.

कागवाड येथील शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या या बैठकीस तहसीलदार रवींद्र हादिमनी, तालुका पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी वीरेंद्र वाली यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, ग्रामविकास अधिकारी आणि ग्राम महसूल अधिकारी उपस्थित होते

 

Tags: