Uncategorized

मुतगा येथे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस आयुक्तांना निवेदन

Share

बेळगाव-बागकोट रस्त्यावरील मुतगा गावात शालेय विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या मार्गावर तातडीने स्पीड ब्रेकर बसवण्यात यावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी बेळगावचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

मुतगा ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांची भेट घेऊन बेळगाव-बागकोट मार्गावरील वाहतूक समस्येबाबत सविस्तर चर्चा केली. मुतगा गावातील मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंना ‘न्यू इंग्लिश स्कूल’ आणि ‘हायप्रायमरी स्कूल’ या शाळा आहेत. त्यामुळे रोज शेकडो विद्यार्थी, शेतकरी व नागरिकांना हा रस्ता ओलांडून जावे लागते. हा रस्ता विमानतळाला जोडणारा असल्याने वाहने वेगाने धावतात आणि पूर्वीचे स्पीड ब्रेकर हटवल्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.

विद्यार्थी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी या ठिकाणी वैज्ञानिक पद्धतीचे स्पीड ब्रेकर बसवावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

ग्रामस्थांची ही समस्या ऐकून घेतल्यानंतर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी त्वरित योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

Tags: