Uncategorized

सोनम वांगचुक यांच्या अटकेचा बेळगावात सीआयटीयूकडून निषेध

Share

नीट परीक्षेतील गैरव्यवहार आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांच्या अटकेचा निषेध करत बेळगावात सीआयटीयू संघटनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले.

या वेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्र सरकारला निवेदन पाठवून केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणाचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला. तसेच जंतरमंतर येथे शांततापूर्ण मार्गाने उपोषण करणाऱ्या सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी अटक केल्याबद्दल सीआयटीयूने संताप व्यक्त केला. दिल्लीत खोटे आरोप लावून आंदोलकांवर कारवाई करत लोकशाही हक्कांची गळचेपी केली जात असल्याचा गंभीर आरोप आंदोलकांनी केला.

या महाघोटाळ्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. याशिवाय सोनम वांगचुक यांची विनाअट सुटका करावी, अशी मागणी सीआयटीयू बेळगाव जिल्हा व तालुका समितीच्या वतीने करण्यात आली.

यावेळी मंदा नेवगी, दिलीप वाकर, जी. आय. कागणिकर, आयना शेख आदींची उपस्थिती होती.

Tags: