धारवाड येथे डॉक्टर पतीची हत्या करून मुलावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. मात्र, पोलीस आयुक्तांच्या सतर्कतेमुळे वेळेत वैद्यकीय मदत मिळाल्याने बालकाची प्रकृती आता स्थिर असून त्याचे प्राण वाचले आहेत.

आरोपी प्रियंका हिने पती किरण यांची हत्या केल्यानंतर मुलगा नेहित याच्यावर चाकूने वार केले. घटनेची माहिती मिळताच हुबळी-धारवाडचे पोलीस आयुक्त एन. शशिकुमार यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. या वेळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या बालकाचा श्वास सुरू असल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आले. त्यांनी कोणताही विलंब न करता बालकाला स्वतः उचलून पोलीस वाहनातून रुग्णालयात दाखल केले.

डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतर आणि वेळेत मिळालेल्या उपचारामुळे बालकाची प्रकृती आता शंभर टक्के सुधारली असून ती धोक्याबाहेर आहे. या प्रकरणी धारवाड उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी प्रियंका हिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


Recent Comments