बागलकोट जिल्ह्यातील जमखंडी शहरात झालेल्या पावसामुळे चौडय्या नगरातील रस्ते पाण्याखाली गेले असून नागरिकांचे हाल होत आहेत.

जमखंडी शहरातील चौडय्या नगरात झालेल्या पावसामुळे संपूर्ण रस्त्यावर पाणी साचले असून ज्येष्ठ नागरिक, शाळकरी मुले आणि वाहनधारकांना ये-जा करताना त्रास सहन करावा लागत आहे. लक्कनकेरी बायपास रस्ता ते विठ्ठल मंदिरापर्यंतच्या रस्ता आणि गटार विकासासाठी १.९७ कोटी रुपयांच्या कामाची निविदा प्रक्रिया ३१ जानेवारीला पूर्ण झाली होती. मात्र, निवडणूक आचारसंहितेचे कारण सांगून कामाला उशीर केला जात असल्याचा आरोप प्रभाग क्रमांक १६ आणि १७ मधील रहिवाशांनी केला आहे.


पाऊस पडल्यावर रस्त्यावर चिखल आणि पाणी साचून घरातून बाहेर पडणे कठीण होत असून, मूलभूत सुविधा पुरवण्यात नगरसभा अपयशी ठरल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे.
या समस्येची दखल घेऊन जमखंडीच्या मुख्याधिकारी ज्योती गिरीश यांनी तातडीने हस्तक्षेप करून थांबलेले काम सुरू करावे, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक रहिवासी राजेशाब मसलळी यांच्यासह नागरिक उपस्थित होते.


Recent Comments