खानापूर तालुक्यातील झुंजवाड येथे श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्रामीण विकास योजना बी.सी. ट्रस्ट आणि साई हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत डोळे व आरोग्य तपासणी शिबिर पार पडले.

झुंजवाड येथे आयोजित या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार आप्पाजी पाटील यांच्या हस्ते झाले.


ग्रामीण भागातील लोकांच्या आरोग्यासाठी संस्था विविध सामाजिक उपक्रम राबवत असून हे शिबिर त्याचाच एक भाग असल्याचे क्षेत्रीय निरीक्षक सुरेंद्र आजगावकर यांनी सांगितले. साई हॉस्पिटलचे डॉक्टर अली यांनी उपस्थितांची मोफत डोळे तपासणी, बीपी आणि शुगर तपासणी करून आरोग्याविषयी मार्गदर्शन केले.
या शिबिराचा लाभ परिसरातील अनेक ग्रामस्थांनी घेतला.या प्रसंगी गावातील मान्यवर आणि योजनेचे पदाधिकारी उपस्थित होते.


Recent Comments