बेळगावात गोसंरक्षणासाठी गोप्रेमींनी मोठी चळवळ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या २७ जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी भव्य स्वाक्षरी मोहीम आणि सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यात गोसंरक्षणासाठी ‘गो सन्मान अभियान’ सुरू करण्यात आले आहे. याअंतर्गत नागरिक आणि विविध संघटनांच्या प्रतिनिधींच्या स्वाक्षऱ्या घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे.

२७ जुलै रोजी सकाळी १०:३० वाजता बेळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनजागृती सभा होणार असून, प्रमुख गोरक्षक निलेश यांच्या नेतृत्वाखाली समाज आणि गोप्रेमी एकत्र येणार आहेत. या मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


Recent Comments