Belagavi

जातीनिहाय जनगणनेवरून काँग्रेस सरकारचे केवळ राजकारण : खास. कोटा श्रीनिवास पुजारी

Share

भाजप खासदार कोटा श्रीनिवास पुजारी यांनी राज्य सरकारवर टीका करत जातीनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून सरकारची कोणतीही बांधिलकी नाही, काँग्रेस केवळ मागासवर्गीय आयोगाच्या अहवालावर राजकारण करत आहे,” असा आरोप त्यांनी केला.

बेळगाव येथील पत्रकार परिषदेत बोलताना भाजप खासदार कोटा श्रीनिवास पुजारी यांनी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आगामी अधिवेशनात हा मधुसूदन अहवाल मांडून तो मंजूर करणार का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कांतराज आयोग स्थापन करून त्यासाठी १६५ कोटी रुपये मंजूर केले होते. मात्र, मधुसूदन अहवाल स्वीकारण्याची मागणी झाल्यावर काँग्रेस हायकमंडने त्यांचा राजीनामा घेतला. सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रिपद सोडण्याच्या शेवटच्या क्षणी हा अहवाल स्वीकारला, मात्र विद्यमान मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार तो जाहीर करणार की नाही, याचे उत्तर अद्याप दिलेले नाही, असे खासदार कोटा श्रीनिवास पुजारी यांनी म्हटले.

या पत्रकार परिषदेला भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल बेनके, बेळगाव भाजप शहराध्यक्षा गीता सुतार, महापौर प्रीती कामकर आणि माजी आमदार संजय पाटील उपस्थित होते.

Tags: