खानापूर तालुक्यातील ‘गृहलक्ष्मी’ आणि ‘गृहज्योती’ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी महत्त्वाचे आवाहन केले आहे.

गृहलक्ष्मी योजनेचे अर्ज खानापूर येथील सीडीपीओ कार्यालयात न आणता, आपापल्या गावातील अंगणवाडी सेविकांकडेच जमा करावेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. खानापूर कार्यालयात हे अर्ज स्वीकारले जाणार नसल्याने महिलांनी विनाकारण हेलपाटे मारू नयेत, असे सांगण्यात आले आहे.

सर्व अंगणवाडी सेविकांना लाभार्थ्यांची नावे नोंदवण्यासाठी विशेष फॉर्म देण्यात आले आहेत. कोणत्याही अंगणवाडी सेविकेने लाभार्थ्यांना खानापूर कार्यालयात पाठवू नये; या नियमाचे पालन न झाल्यास संबंधित अंगणवाडी सेविकेवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. पावसाचे दिवस असल्याने महिलांनी आपला वेळ वाचवण्यासाठी अंगणवाडी केंद्रातच कागदपत्रे द्यावीत.
गृहज्योती विज बिल माफी योजनेच्या नोंदणीसाठी हेस्कॉम (केईबी) चे अधिकारी थेट लाभार्थ्यांच्या घरी भेट देणार आहेत. अधिकारी घरी आल्यावर लाभार्थ्यांनी त्यांना फोटो, ओळखपत्र आणि वीज बिल दाखवून फॉर्म भरून घ्यायचा आहे. जे लाभार्थी भाड्याच्या घरात राहतात, त्यांनी घरमालकाचा भाडे करार, घरमालकाचे मतदान कार्ड आणि ओळखपत्र अधिकाऱ्यांकडे देणे गरजेचे आहे.
— अल्ताफ एम. बसरीकट्टी, इन न्यूज, खानापूर


Recent Comments