Khanapur

खानापूर तालुक्यात महिलेवर कोयत्याने प्राणघातक हल्ला

Share

खानापूर तालुक्यातील होनकल गावात शेतात काम करणाऱ्या एका महिलेवर कोयत्याने प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे. सध्या बेळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या या पीडित महिलेची खानापूर येथील काँग्रेस नेत्यांनी भेट घेऊन तिच्या प्रकृतीची विचारपूस केली.

शेतात काम करत असताना झालेल्या या हल्ल्यात शोभा मादार ही महिला गंभीर जखमी झाली आहे. खानापूर ब्लॉक काँग्रेस महिला आघाडीच्या अध्यक्षा सावित्री मादार आणि ब्लॉक काँग्रेस ग्रामीणचे अध्यक्ष तथा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. ईश्वर घाडी यांनी बेळगाव जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन जखमी महिलेला धीर दिला. समाजकल्याण विभागाच्या वतीने पीडितेला जास्तीत जास्त शासकीय मदत आणि भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन या नेत्यांनी दिले.

या भेटीदरम्यान काँग्रेस नेत्यांनी उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी चर्चा केली. त्यांनी जखमांचे गांभीर्य आणि महिलेच्या सध्याच्या प्रकृतीविषयी सविस्तर माहिती घेऊन योग्य उपचार करण्याचे आवाहन केले. या प्रकरणी स्थानिक पातळीवर पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

अल्ताफ एम. बसरीकट्टी
इन न्यूज
खानापूर

Tags: