रामदुर्ग तालुक्यातील कित्तूर गावामध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एक नवजात बालक सापडल्याची घटना समोर आली आहे. या बालकाला वेळीच सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

कित्तूर-नरगुंद रस्त्यावरील बसवणकट्टी पुलाच्या खाली कचऱ्यामध्ये हे नवजात बालक टाकण्यात आले होते. तिथून जाणाऱ्या मेंढपाळांना बालकाच्या रडण्याचा आवाज आल्याने त्यांनी तात्काळ शोध घेऊन बालकाला सुखरूप बाहेर काढले.

या घटनेची माहिती मिळताच संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. नवजात बालकाला तातडीने उपचारासाठी सवदत्ती येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, डॉक्टरांचे पथक बालकाच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.
घटनेची माहिती मिळताच सुरेबान पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. बालकाला कचऱ्यात सोडून जाणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरातील नागरिकांकडे चौकशी सुरू केली असून, विविध घटकांच्या आधारे तपास केला जात आहे.


Recent Comments